गणाअवधूत महाराज (गणा महाराज), महाराजांना त्यांचे हजारो भक्तगण “गणा महाराज “म्हणून ओळखतात. महाराष्ट्र आणि परदेशातही भक्तांची महाराजांवर “अवलिया ” म्हणून निस्सीम श्रद्धा आहे. अवलिया म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेला संत, ज्यांनी सिद्धी प्राप्त केली आहे.
भक्तगण गणा महाराजांना भगवान दत्तात्रेय (दत्तगुरु), श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज आणि चिलें महाराज यांचा अवतार मानतात. महाराजांच्या एका नजरेने आपल्या भक्तांवर असीम कृपा होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. महाराज आपल्या चमत्कारिक कृतींसाठी आणि कोणत्याही शब्दांशिवाय माणसाच्या अडचणी अचूक ओळखण्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यांची केवळ उपस्थिती जीवनातील कोणत्याही आव्हानांवर आणि समस्यांवर तोडगा काढून देणारी मानली जाते.
महाराजांची व्यक्तिमत्त्व अत्यंत वेगळी आहे. विशेष गरजा असलेल्या व्यक्तीसारखा शारीरिक देखावा आणि बालसुलभ व्यक्तिमत्त्व असलेले महाराज दैवी प्रेम, आनंद आणि साधेपणा प्रकट करतात. ते असामान्य दिसू शकतात, अनेकदा सिगारेट ओढताना दिसतात, परंतु त्यांची ही विचित्रता आणि देखावा एक उद्देश साधते – अवांछित लक्ष आणि लोकांना दूर ठेवणे.
नामांकित उद्योजक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते अशा उच्चपदस्थ व्यक्तींपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व स्तरातून महाराजांचे भक्त येतात. आपलं आयुष्य बदलून टाकणारे महाराजांचे कृपार्शिवाद आणि गुरु म्हणून महाराजांवर असलेले नितांत प्रेम, निस्सीम श्रद्धा ह्यातून ही सर्व लोक एकत्र येतात. महाराज जरी कोल्हापूरस्थित असले तरी, त्यांच्यावरील भक्तीचा प्रभाव महाराष्ट्र आणि परदेशातही पसरला आहे, म्हणूनच अनेक श्रद्धाळू भाविक पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधून त्यांचे दिव्य आशिर्वाद मिळवण्यासाठी येतात .
महाराजांच्या सहवासात सर्व दुःख दूर होतात. जीवनात त्याची जागा दैवी आध्यात्मिक आनंद घेतो.. जीवनाला पूर्णता येते. येथे मिळते ती फक्त आणि फक्त आपल्या प्रिय गुरूंची असीम कृपा.